¡Sorpréndeme!

Harshvardhan Patil | 'राज्यमंत्री भरणेंना काही अडचण आली,तर आम्हाला सांगा'| dattatray bharn e|Sakal Media

2021-08-30 701 Dailymotion

Harshvardhan Patil | 'राज्यमंत्री भरणेंना काही अडचण आली,तर आम्हाला सांगा'| dattatray bharn e|Sakal Media
पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये राजकीय टोलेबाजी रंगली. ‘काही पत्रकारांचे प्रश्न आहेत. सरकारचे मंत्री येथे उपस्थित असल्यामुळे ते बघतील, त्या प्रश्नांचे काय ते. सध्या आम्ही विश्रांती घेतोय, त्यामुळे काम त्यांनी बघावं. (त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.) सरकारदरबारी जे प्रश्न असतील, ते सरकार म्हणून त्यांनी निश्चित सोडवावेत. त्यांना काही अडचण आली तर आम्हाला सांगा, आम्ही दिल्लीतून काही आणू, असे पाटील यांनी सांगितले. त्यावर राज्यमंत्री भरणे यांनी, ‘येत्या आठ दिवसांत पत्रकारांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावतो,’ अशा शब्दांत पत्रकारांना आश्वस्त केले.
#Pune #Harshvardhan Patil #Dattatray Bharne #Journalist